Pik Vima Yojna Hafta: राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत गंभीर चर्चा झाली. पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने पीक विम्याचा आग्रीम हप्ता 25 टक्के देता येईल का, या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे.
ज्या ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे त्या ठिकाणी चारा छावण्या, पिण्याचे पाणी आणि इतर पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 81.07 टक्के पाऊस झाला आहे. 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या केवळ 13.60 टक्के पाऊस पडला आहे. 2579 पैकी 446 महसुली भागात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे.
Post a Comment